युद्धामुळे खाद्यतेलाच्या दरवाढीचा भडका, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले ; नवे दर तपासा?

मार्च 23, 2026 4:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर दिसू लागला आहे. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे सोयाबीन, पामतेल आणि सूर्यफूल या खाद्यतेलांच्या आयातीत मोठी घट झाली आहे. परिणामी जळगावसह राज्यातील बाजारपेठांमध्ये खाद्यतेलांच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

oil 2

केवळ तेलच नाही तर इंधन दरवाढीने इतरही वस्तूंच्या दरवाढीमुळे स्वयंपाकघराचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे गृहिणींचे खर्चाचे गणित कोलमडले आहे.

भारत हा जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरणाऱ्या देशांपैकी एक असून देशांतर्गत उत्पादन अपुरे पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावे लागते. मात्र सध्या युद्धामुळे आयातीला अडचण असल्याने या तेलांचे दर चांगलेच वाढले आहेत. परंतु शेंगदाणा तेलाच्या दरावर फारसा परिणाम नाही.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीन, सूर्यफूल या तेलाचे जे दर होते. त्यात सध्या तब्बल १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सूर्यफूल आणि सोयाबीनची मोठी आवक परदेशांमधून होते. सध्या युद्धामुळे आवक होऊ शकत नाही, त्याचा हा परिणाम आहे. मात्र शेंगदाणा हा स्थानिकठिकाणांहूनच उपलब्ध होत असल्याने या तेलाच्या दरात फारशी वाढ झालेली नाही.आधीच गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेचा प्रश्न अद्याप कायम असतानाच पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा खर्च आणखी वाढण्याची भीती आहे. आधीच घरगुती गॅसचे दरही सिलिंडरमागे ६० रूपयांनी वाढले आहेत. त्यात इतर वस्तूंची होणारी दरवाढ बजेट कोलमडून टाकणारी आहे.

खाद्यतेलाचे प्रतिकिलो दर असे वाढले
खाद्यतेल……….१ मार्च………
आजचे दर
सोयाबीन…..१३० ते १३५….. १५० ते १६०
सूर्यफूल…..१३५ ते १५ …… १७० ते १८०
शेंगदाणा…..१६० ते १८०….. १७० ते १२०
तीळ….. २३० ते २४० ….. २६५ ते २७०

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now