⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

नख वाढवायची आहेत? तर या उपायांचा करा वापर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ ।  मुली जेव्हा सौंदर्याचा विचार करतात, तेव्हा तो केवळ त्वचा, केस इथपर्यंत मर्यादित नसतो. अनेक मुली त्यांच्या नखांचीदेखील विशेष काळजी घेतात.याच बरोबर जेव्हा मुलं देखील सौंदर्याचा विचार करतात तेव्हाही त्यांना स्वतःची नख मोठीच हवी असतात. अश्या वेळी जर सर्वांनाच आपली नख वाढवायची असतात तर ती वाढवायची कशी असा प्रश्न त्यांच्या समोर येतो.

कारण घरकाम करणाऱ्यांमध्ये आणि गर्दीत फिरणाऱ्यांना नखं वाढवणं आणि जपणं कठीण जात. त्यामुळे अनेक मुली आर्टिफिशिअल नखांचा वापर करतात.तर मुलं ती नख वाढवू शकत नाहीत. ज्या मुलींची किव्वा मुलांची नखं झटपट वाढत नाहीत किंवा ठिसूळ नखांमुळे ती वारंवार तुटतात. अशांसाठी नखांची वाढ सुधारण्यासाठी काही नैसर्गिक उपाय फायदेशीर आहेत.

नखं वाढवण्यासाठी खास टिप्स :
नखांना वाढवण्यासाठी लसूण फायदेशीर आहेत. ३-४ लसणाच्या कळ्या गरम पाण्यामध्ये मिसळून १५ मिनिटं उकळा. त्यानंतर लसणाच्या कळ्यांची पेस्ट करा. लसणाची पेस्ट, व्हिटॅमिन ईची कॅप्सूल आणि लिंबाचा रस एकत्र करून नखांवर लावा. नखांवर पेस्ट सुकल्यानंतर साध्या पाण्याने नखं स्वच्छ करा.