⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 5, 2024
Home | जळगाव जिल्हा | जामनेर तालुक्यातील महिला सरपंच अपात्र ; विभागीय आयुक्तांच्या कारवाईने खळबळ

जामनेर तालुक्यातील महिला सरपंच अपात्र ; विभागीय आयुक्तांच्या कारवाईने खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२४ । रिक्त उपसरपंचपद भरण्यात कर्तव्य कसूर केल्याने जामनेर तालुक्यातील वाकोद येथील सरपंच सरला संजय सपकाळे यांना सरपंचपदावरून अपात्र करण्यात आले. त्याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी काढले आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली.

नेमकं प्रकरण काय?
जामनेर तालुक्यातील वाकोद येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच रविंद्र भगवान भगत यांची निवड २०२१ साली कायदेशीर करण्यात आली होती. व वाकोद ग्रामपंचायतीचे ११ सदस्य अपात्र संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील काही अर्ज मंजूर हावून काही अर्ज अंमि निकालासाठी बाकी होते. त्यानुसार काही सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती. दरम्यान उपसरपंच रविंद्र भगत यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे सिध्द झाल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार २९ मे २०२३ रोजी पदावरून अपात्र केले होते.

तेव्हा पासून उपसरपंचपद रिक्त होते. नियमानुसार ३० दिवसाच्या आत उपसरंपच पदाचे रिक्तपद भरण्याचे आवश्यक असतांना सरपंच सरला सपकाळे यांनी कर्तव्यात कसूर केल्याने गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेले उपसरपंचपद भरलेले नाही. याला सरपंच सरला सपकाळे हे जबाबदार असल्याचे ठरवून अपात्र करावे असा अहवाला जिल्हा परिषेच्या माध्यमातून विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आला. या अवहवालाचे अवलोकन केल्यानंतर नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी सरपंच सरला संजय सपकाळे यांना अपात्र करण्याचा निकाल दिला आहे. मुळ तक्रार अर्चना दिपक गायकवाड ह्या आहेत, त्यांच्यातर्फे ॲड.विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले. या कारवाईमुळे जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.