जळगाव लाईव्ह न्यूज । जर तुम्ही नवीन विवो (Vivo) स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल, तर तुमच्या खिशाला आता अधिक कात्री लागणार आहे. कारण विवो इंडियाने आपल्या अनेक लोकप्रिय मॉडेल्सच्या किमतीत १ हजार ते ४ हजार रुपयांपर्यंत मोठी वाढ केली आहे. २१ एप्रिलपासून या नवीन किमती लागू झाल्या असून, कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरही बदललेले दर अपडेट करण्यात आले आहेत.

दरवाढीचे कारण काय?
टिपस्टरच्या माहितीनुसार, स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये सध्या दरवाढीचा कल पाहायला मिळत आहे. इतर ब्रँड्सनीही गेल्या काही आठवड्यांत किमती वाढवल्या आहेत. पुरवठा साखळीतील अडथळे, सुट्या भागांच्या (Components) वाढत्या किमती आणि चलनातील चढ-उतार यामुळे ही दरवाढ झाल्याचे समजते.

भारतात विवो टी5एक्सची किंमत
या विवो स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिएंटच्या किमतीत 4,000 ने वाढ करण्यात आली आहे. 6GB/128GB व्हेरिएंटची किंमत आता 18 हजार 999 रूपयांवरून 22 हजार 999 रूपये झाली आहे, तर 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 24 हजार 999 रूपये आणि 8GB/256GB व्हेरिएंटची किंमत 26 हजार 999 रूपये झाली आहे.
भारतात विवो Y400 ची किंमत
या विवो फोनचा 8GB/128GB व्हेरिएंट आता 25 हजार 999 रुपयांऐवजी 28 हजार 999 रुपयांना विकला जात आहे, तसेच 8GB/256GB व्हेरिएंटची किंमत देखील 27 हजार 999 रुपयांवरून 31 हजार 999 रुपयांपर्यंत वाढली आहे.
भारतात Vivo V70 Elite ची किंमत
या विवो मोबाईलचा 8GB/256GB व्हेरिएंट 51 हजार 999 रुपयांऐवजी 55 हजार 999 रुपयांना विकला जाईल, तर 12GB/256GB व्हेरिएंटची किंमत 56 हजार 999 रुपयांवरून 59 हजार 999 रुपयांपर्यंत वाढली आहे.
भारतात विवो Y51 प्रो ची किंमत
या विवो स्मार्टफोनचा 8GB/128GB व्हेरिएंट 24 हजार 999 रुपयांऐवजी 27 हजार 999 रुपयांना, तर 8GB रॅम/256GB व्हेरिएंट 27 हजार 999 रुपयांऐवजी 30 हजार 999 रुपयांना विकला जात आहे.
भारतातील विवो Y31 5G ची किंमत
हा विवो 5G स्मार्टफोन आता महाग झाला असून, 4GB रॅम/128GB व्हेरिएंटची किंमत 18 हजार 999 रूपयांऐवजी 19 हजार 999 झाली आहे. 6GB रॅम/128GB व्हेरिएंट आता 20 हजार 999 ऐवजी 23 हजार 999 मध्ये उपलब्ध आहे.
भारतात विवो व्ही70 ची किंमत
या विवो फोनच्या किंमतीतही 4 हजार रुपयांची वाढ झाली असून, 8जीबी/256जीबी व्हेरिएंटची किंमत 45 हजार 999 रुपयांवरून 49 हजार 999 रुपये झाली आहे, तर 12जीबी/256 जीबी मॉडेल आता 49 हजार 999 रुपयांऐवजी 53 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.











