रायसोनी स्कूलमध्ये विठु माऊलीची दिंडी बालकलाकारांच्या हस्ते
जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये विठु माऊलीच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला, या कार्यक्रमात सर्व प्रथम, वारकरी दिंडींचे आयोजन करण्यात आले.
वारकरी दिंडींत विद्यार्थ्यांनी विठ्ठल – रुक्मीणी, वारकरी यांचा पेहराव केला होता, तसेच ताणी माथुरवैश्य ह्या विद्यार्थ्यीनीने रूख्मीणीचा पेहराव परिधान केला होता. जयेश कोळी या विद्यार्थ्याने विठ्ठलाचा पेहराव परिधान केला. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ, मृदूंग, वीणा तसेच विठ्ठल नामाच्या गजरात शाळेपासून ते भवानी मातेच्या मंदीरापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली.
पालखीचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी करुन आषाढी एकादशीचे महत्व विद्यार्थ्यांना समजविले. पालखी सोहळ्याचे आयोजन झाल्यानंतर गायन स्पर्धा व फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये लहान मुलांनी संत तुकाराम , संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत एकनाथ , संत जनाबाई अशा विविध भुमिका साकारल्या. संस्थेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी व पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा ललिता टिपरे यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षकवृंदांचे व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे कौतुक केले.