⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | पाचोऱ्यातील एमएम महाविद्यालयाला कुलगुरू डॉ.व्ही.एल माहेश्वरी यांची भेट

पाचोऱ्यातील एमएम महाविद्यालयाला कुलगुरू डॉ.व्ही.एल माहेश्वरी यांची भेट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । पाचोरा येथील पीटीसी संस्थेच्या एम एम महाविद्यालयास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ व्ही एल माहेश्वरी यांनी भेट देऊन महाविद्यालयातील विविध विभाग, लेडीज रूम, विद्यार्थ्यां साठीच्या सुविधांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.

कुलगुरू डॉ माहेश्वरी यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विज्ञान विभागांच्या प्रयोगशाळां सोबतच गणित विभाग, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राची इमारत ,ग्रंथालय, प्राध्यापक दालन , विद्यार्थ्यां साठीच्या विविध सुविधा व योजना यांची पाहणी केली. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ ,व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी यांनी कुलगुरू डॉ माहेश्वरी यांना संस्था व महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसह सर्वांगीण प्रगती संदर्भात माहिती दिली. एकंदरीत नियोजन व सुविधा पाहून कुलगुरू डॉ माहेश्वरी यांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी खलील देशमुख, प्राचार्य डॉ शिरीष पाटील, डॉ एन एन गायकवाड, निवृत्त उपप्राचार्य सुभाष तोतला, कनिष्ठ महाविद्यालय चेअरमन नाना देवरे, संचालक खलील देशमुख, दगाजी वाघ, सतीश चौधरी , अर्जुनदास पंजाबी, प्रकाश पाटील भागचंद राका, योगेश पाटील, राकेश थेपडे, उपप्राचार्य डॉ वासुदेव वले,डाॅ जे व्ही पाटील आदी उपस्थित होते. प्राचार्य शिरीष पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य डॉ वासुदेव वले यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. प्रा सी एन चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य ङॉ जे व्ही पाटील यांनी आभार मानले.

राष्ट्रगीत गायनाने सांगता झाली. फोटो = पाचोरा महाविद्यालयात विविध विभागांच्या पाहणी प्रसंगी कुलगुरू डॉ व्ही एल माहेश्वरी, शेजारी राधेशाम चांडक,संजय वाघ ,व्ही टी जोशी,प्रा सुभाष तोतला ,डॉ शिरीष पाटील,डॉ एन एन गायकवाड ,नाना देवरे ,सतीश चौधरी आदी.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.