---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

विनोद देशमुखांनी धमकविल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा

new project
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज। २६ मे २०२१ – शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश टेकवानी यांना फोनवरून शिवीगाळ करीत धमकविल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

new project

शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश तुलसीदास टेकवानी रा.आदर्श नगर यांच्याकडून मनोज वाणी यांनी जुनी कार खरेदी केली होती. गाडीचे पैसे घ्यायचे असल्याने ते नेहमी धमकी देत होते. दि.२१ मे रोजी रात्री ११.३० वाजता टेकवानी यांना फोन करून शिवीगाळ करीत माझ्याविरुद्ध तक्रार दिल्यास तुला खोट्या गुन्ह्यात अडकवेल असा दम दिला. दरम्यान, टेकवानी यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दाखल केली असून मला व माझ्या परिवाराला धोका निर्माण झाल्यास त्यास विनोद देशमुख आणि मनोज वाणी जबाबदार असतील अशी तक्रार त्यांनी दिली आहे. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---