जळगावकरांच्या खिशाला कात्री! विकास गोल्ड दुधाच्या दरात वाढ, 1 मार्चपासून नवे दर लागू

फेब्रुवारी 28, 2026 10:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२६ । आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या जळगावकरांना आता दुधाच्या दरवाढीचा फटका बसणार आहे. जळगाव जिल्हा दूध संघातर्फे येत्या १ मार्चपासून गोल्ड दूधाच्या एक लिटर व पाच लिटर पाऊचच्या दरात प्रति लिटर १ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ मार्च २०२६ पासून हे नवीन दर लागू होणार असून, मात्र अर्धा लिटरच्या पाऊचला या दरवाढीतून वगळण्यात आले आहे.

vikas

संघाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दूधाच्या दरात प्रति लिटर तब्बल सात रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याउलट विक्री दरात अडीच महिन्यांपूर्वीच दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे खरेदी आणि विक्री दरातील सुमारे पाच रुपयांची तूट निर्माण झाली आहे.

ही तूट कमी करण्यासाठी आणि संघाचा आर्थिक समतोल राखण्यासाठी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघाचे व्यवस्थापकीय यांनी स्पष्ट केले. दरवाढ १ मार्चपासून लागू होणार असून, त्यानंतर गोल्ड दूधाचे एक व पाच लिटर पाऊच प्रति लिटर एक रुपयांनी महाग मिळणार आहे. दरम्यान, अर्धा लिटर पाऊचच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now