जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याजागी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष्य लागले होते, अखेर आज विद्या चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.
विद्या चव्हाण यांनी ही नियुक्ती स्विकारत असल्याचे सांगतानाच महागाईसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाला आहे. महिला वर्ग त्रासाला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे स्पष्ट केले. अनेक महिला पक्षात चांगले काम करत आहेत. मला पक्षाने संधी दिली आहे आणि जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र ठरेन असे सांगतानाच माध्यमाकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षाही विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली.
विभागवार नियुक्तीपत्रे
नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी आदींची नियुक्तीही खासदार फौजिया खान यांनी जाहीर केली.