जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२५ । बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेद्र यांचं २४ नोव्हेंबर रोजी धर्मंद्र निधन झालं. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह देशभरात शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त होतोय.

दरम्यान, अनेकांकडून धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. धमेंद्र यांना शेतीची प्रचंड आवड होती. त्यांचं लोणावळ्याजवळच्या औंढे गावात शंभर एकरावर मोठे फार्म हाऊस आहे. त्यांनी जवळपास ६५ एकर शेतीत विविध प्रकारची फळे, कोबी, टोमॅटो, वांगी यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड केली होती. शेतीतून मिळणारे उत्पन्न ते शेतात काम करणाऱ्या मजुरांना वाटून देत असत.

शेतीची आवड असल्यानं धमेंद्र हे २०१६ मध्ये जळगावात आले होते. जळगावात आल्यानंतर त्यांनी केळीसह डाळिंब, स्ट्रॉबेरी, पेरू, मोसंबीवर सुरू असलेल्या संशोधनाची माहिती घेतली असल्याचे सांगितले जाते.
तसेच स्व. निखील खडसे चषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त धमेंद्र जळगावात आले होते. त्यावेळी धर्मेंद्र यांच्यासमवेत त्यावेळी बॉबी देओल, महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे आदी उपस्थित होते.







