⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

नवीन दराप्रमाणे फी भरलेल्या गाडी मालकांची अडवणूक होऊ नये

जळगाव जिल्हा मोटार चालक मालक प्रतिनिधी युनियनची मागणी

जळगाव लाईव्ह न्युज । १४ एप्रिल २०२२ । ज्या वाहनधारकांनी १ एप्रिल २०२२ नंतर CFRA साठी फी भरलेली आहे अशाच लोकांना नवीन दर नियमाप्रमाणे लागू होतात ज्यांनी ३१ मार्च पूर्वी फी भरलेली आहे अशा वाहनाला नवीन दर प्रमाणे फी व दंड होऊन शकत नाही. फी भरलेल्या गाडी मालकांची अडवणूक करण्यात येऊ नये व ज्यांनी ३ मार्च पर्यंत फी भरली आहे त्यांना पासिंग करून देण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन जळगाव जिल्हा मोटार चालक मालक प्रतिनिधी युनियन संघटनेतर्फे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांना देण्यात आले आहे.

सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १ एप्रिल पासून १५ वर्ष झालेले मोटार वाहन CFRA पासिंग फि जड वाहनांसाठी 12500 व हलके वाहन 7500 मध्यम माल यात्री 10000 अशी भरमसाठ फी वाढ करण्यात आलेली आहे. परंतु ज्या मोटार वाहन मालकांनी मार्चमध्ये किंवा त्यापूर्वी शासकीय CFRA पासिंग फी भरलेली आहेत अशा वाहन मालकांची गाडी पासिंग करून मिळावी. वाहन तपासणी करिता पुढील तारीख CFRA साठी मिळते परंतु आपल्या कार्यालयातील CFRA तपासणीसाठी नेमलेले अधिकारी हे सांगतात की, नवीन दंड व फी भरावी लागेल तरी आमच्या युनियन तर्फे मागणी आहे की, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी आपल्या आयएमव्ही अधिकारी यांना सांगावे की, ज्यांनी ३१ मार्च पूर्वी फी भरलेली आहे अशा वाहनांना नवीन फी भरण्याची गरज नाही. ज्यांनी १ एप्रिल नंतर CFRA साठी फी भरलेली आहे अशाच लोकांना नवीन दर नियमाप्रमाणे लागू होतात. दंड आकारणे मुळे फी भरलेले सर्व वाहन मालक ट्रॅक्टर वर येण्यास तयार नाही वाढत्या महागाई व इंधन विमा व नवीन दंड या सर्व दरवाढीमुळे वाहन रस्त्यावर चालवणे कठीण झाले आहे. युनियन तर्फे व संघटनेतर्फे युनियनचे अध्यक्ष रज्जाक खान गणी खान, उपाध्यक्ष सरसंण वासू पाणीकर, सचिव सुरेश पाटील, सय्यद आसिफ, गणेश राणे, दीपक नेटके, भावेश मोमाया, दीपक जैन, मनोहर खर्चे, रामा शिरसाट, अल्ताफ अहमद हाफिज खान, अनिस खान यांच्या वतीने सदर निवेदन देण्यात आले आहे.