⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

पांझरा गोशाळेतील ४५० गुरांचे लसीकरण

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । अमळनेर येथील चोपडा रोडवरील पांझरापोळ गाे शाळेतीळ ४५० बैल, गाय व इतर गुरांना लंम्पी डीसीस प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. लायन्स क्लबच्या सौजन्याने ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा कोरे, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, राजेंद्र देसर्डा, डॉ. दीपक पाटील, योगेश मुंदडा, विनोद अग्रवाल, डॉ. रवींद्र जैन, दिलीप जैन, जितेंद्र जैन, मनोज जीवनानी, सुनील छाजेड, अजय हिंदुजा, प्रसन्न जैन आदी उपस्थित होते. उपक्रमास ज्ञानेश्वर धनगर यांचे सहकार्य लाभले. अरुण कोचर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ही गाे-शाळा अनेक वर्षापासून सुरु असून आज या ठिकाणी ४५० गुरे आहेत. यासाठी महिन्याला दोन ते अडीच लाख खर्च येतो. या गाे- शाळेला शासनाचे कुठलेही अनुदान नाही. परंतु शहरातील गो-प्रेमी, दानशूर व्यक्ती यांच्या मार्फत ही सेवा सुरू आहे, असे काेचर म्हणाले. तर लायन्स क्लबचे योगेश मुंदडा यांनी, यापुढे लायन्स क्लबच्या सहकार्याने शहरातील भानुबेन गाे शाळेतील व शिरूड येथील गाे शाळेतील गुरांचे ही लसीकरण केले जाईल, असे आश्वासन दिले.