जळगाव शहर

भाजपा उद्योग आघाडीतर्फे आयोजित शिबिरात ४०० नागरिकांचे लसीकरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । भारतीय जनता पार्टी महानगराच्या जिल्हा उद्योग आघाडीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरात एमआयडीसी परिसरातील ४०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी महानगराच्या जिल्हा उद्योग आघाडीच्यावतीने एमआयडीसीतील जिंदा भवन येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात दिवसभरात ४०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. एमआयडीसी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, या हेतूने मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस लसीकरण कार्यक्रम सुरू राहणार आहे. नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे, उद्योग आघाडीचे अध्यक्ष संतोष इंगळे, नगरसेवक किरण खडके, नगरसेविका रंजना वानखेडे यांनी केले आहे. याप्रसंगी शहर उपाध्यक्ष प्रदीप रोटे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, अयोध्या नगर मंडलअध्यक्ष विजय वानखेडे, सरचिटणीस किसन मराठे, युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय जेजुरकर, उद्योजक भारतीचे समीर साने, उद्योजक रवी लड्डा, विनोद बियाणी, अरुण बोरोले, समीर चौधरी, बबलू भोळे, सुनील सुखवानी, शैलेश काबरा, राजू वाघ, वामन महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी हर्षल इंगळे यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button