जळगाव लाईव्ह न्यूज| २० ऑगस्ट २०२३। पोलिस पाटील भरतीसाठी अनेकांनी बेकायदेशीर इडब्ल्यूएस (आर्थिक दुर्बल घटक) काढल्याचे उघडकीस आले असून, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पोलिस पाटील भरतीत आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण आहे. त्यामुळे काही गावांना इडब्ल्यूएस घटकांना संधी मिळणार आहे.
चोपडा तालुक्यातील लासूर येथे योगेश माळी, सुरेश माळी, वासुदेव महाजन (माळी), प्रेमराज शेलकर (माळी/महाजन) यांनी आर्थिक दुर्बल घटक म्हणजे इडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळवले आहे. शासन नियमानुसार अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, ओबीसी, भटक्या विमुक्त जमाती आदी घटकांना इडब्ल्यूएस प्रमाणपत्र देता येत नाही.
त्यामुळे खुल्या गटातील उमेदवार वंचित राहण्याची शक्यता आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लासूर येथील जितेंद्र गांगुर्डे यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्याकडे केली आहे.