⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

सरपंचपदी‎ सुवर्णा पाटील यांची बिनविरोध निवड‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । पारोळा तालुक्यातील टोळी गावातील लोकांच्या समजूतदार पानाने ग्रामपंचायतीची निवडणूक‎ प्रकिया बिनविरोध पार पडली. यात‎ सुवर्णा पाटील यांची बिनविरोध‎ सरपंचपदी निवड करण्यात आली.‎

या वेळी उपसरपंच बाबुराव पाटील, सदस्य वाल्मीक ‎पाटील, कनिलाला पाटील,‎ अलका पाटील, मनीषा‎ पाटील, सुमनबाई पाटील,‎ अरुणाबाई पाटील,‎ मालूबा भील व पोलिस‎ पाटील नलिनी पाटील‎ तसेच तलाठी, ग्रामसेवक, कर्मचारी‎ व ग्रामस्थ उपस्थित होते.‎ नवनिर्वाचित सरपंच सुवर्णाबाई‎ पाटील या पंचायत समितीच्या माजी‎ सभापती सरलाबाई शांताराम पाटील‎ व टाेळीचे माजी सरपंच शांताराम‎ सखाराम पाटील यांच्या सून तर‎ प्रवीण शांताराम पाटील यांच्या पत्नी‎ आहेत.‎