---Advertisement---
गुन्हे

धक्कादायक : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । अवघ्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलावर एकाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना भुसावळ तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी एकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 3

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील सहा वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. 3 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 1.30 वाजेच्या सुमारास मुलगा घरी असताना संशयीत आरोपी फैजल अश्फाक शेख याने मुलाला जवळ बोलावून नवीन बॉल घेण्यासाठी 20 रुपये देतो, असे सांगून त्याच्या घरात नेत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार मुलाच्या घरच्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी वरणगाव पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्या तक्रारीवरून आरोपी फैजल अश्फाक शेख याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुमराम दळवी करीत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---