जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटलांचा असंख्य कार्यकर्तांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मार्च 6, 2026 11:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासह भाजपच्याही अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

unemsh patil join shivsena

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि उबाठा गटाचे उत्तर महाराष्ट्रातील नेते उन्मेश पाटील यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी “उन्मेश पाटील पुन्हा जळगावचे खासदार होतील,” असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नव्या चर्चांना उधाण आले आहे. कारण, सध्या जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपचे आहेत.

दरम्यान, या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, सुनील चौधरी तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांनी केला शिवसेनेत प्रवेश
उन्मेष पाटील यांच्यासोबत आज पंचायत समितीचे माजी सभापती, भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष दिनेश बोरसे, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, भाजपचे माजी सभापती लीलाभाई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी चौधरी, भाजपचे माजी नगरसेवक चंदू तायडे, माजी नगरसेवक चिरागउद्दीन शेख, माजी नगरसेवक गणेश महाले, दिपक देशमुख, सुबोध वाघमारे, गवळी समाजाचे प्रमुख विजू गवळी, ओबीसी समाजाचे संजय चौधरी, बाळासाहेब पाटील, अनिल चव्हाण, रोहीत खैरनार, मंगेश साबळे, सोमनाथ पाटील, चंद्रकांत पाटील, रमेश पाटील, योगेश मोरे, राजेंद्र सोनावणे, महादेव गायकवाड, विलास गवळी, सुनिता पवार, रत्ना पाटील यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचा भगवा झेडा हाती घेतला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now