मामाची दुचाकी भाच्या.. पाणी भरण्यास आले असता प्रकार उघड झाला

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । यावल तालुक्यातील किनगाव गावातून अज्ञात चोरट्यांनी मामाची दुचाकी भाच्याच्या घरासमोरून लांबवली. या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.


किनगाव खुर्द येथील सरफराज युनूस पिंजारी (25) यांनी मामा शेख नईम शेख सलमी पिंजारी (आमोदा) यांची बजाज कंपनीची प्लॅटीना (एम.एच.19 ए.टी.8850) शेती कामानिमित्त घरी आणली होती. रविवार, 6 नोव्हेंबर रोजी ही दुचाकी घराबाहेर लावली असताना चोरट्यांनी संधी साधली. सोमवारी सकाळी सरफराज पिंजारी हे नेहमी प्रमाणे पाणी भरण्यास बाहेर आले असता दुचाकी चोरीचा प्रकार उघड झाला. पिंजारी यांनी तक्रार दिल्याने यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.