केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान उद्या जळगाव दौऱ्यावर ; असा असणार नियोजित दौरा?

मार्च 18, 2026 11:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान (shivraj singh chauhan) हे उद्या १९ मार्च रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांचा अधिकृत दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, या दौऱ्यात ते शेतीविषयक महत्त्वाच्या उपक्रमांना भेट देणार आहे.

shivraj singh chauhan

असा असणार नियोजित दौरा?

गुरुवारी सकाळी ८ वाजता विशेष विमानाने दिल्लीहून जळगावकडे प्रयाण करतील. ९.३० वाजता जळगाव विमानतळावर आगमन होईल. ११ वाजेपर्यंत जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या प्रकल्पांना भेट आणि पाहणी करतील. यानंतर १ वाजेपर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे केळी उत्पादक भागधारक यांच्यासोबत महत्त्वाची बैठक आणि विचारमंथन सत्र होईल. यावेळी केळी उत्पादकांशी संवाद साधणार असून व्यापाऱ्यांसह बाजार समित्यांच्या प्रतिनिधींशीही संवाद साधणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच एकाच कार्यक्रमात केळी उत्पादक, व्यापारी आणि बाजार समित्यांचे प्रतिनिधी एकत्र येणार आहेत.

यानंतर दुपारी २.३० ते संध्याकाळी ५ पर्यंत अमळनेर मंगल ग्रह मंदिरात आगमन आणि भूमी सुपोषण अभियानाचा शुभारंभ करतील. यानंतर संध्याकाळी ६:३० वाजता ते जळगाव विमानतळावर परततील आणि रात्री ८.१५ वाजेपर्यंत दिल्लीला रवाना होतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now