अज्ञात चोरट्यांनी घरातून रोकडसह दागिने केले लंपास; गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । सावखेडा शिवारातील पोतदार शाळेजवकाल शांतीनगरातील कैलास बाबुराव चव्हाण (वय ४०) यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोकड आणि दागिने लंपास केले आहे. याप्रकरणी चव्हाण यांच्या फिरयादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर असे की, कैलास बाबुराव चव्हाण (वय ४०) रा. शांतीनगर पोतदार शाळेच्या मागे, सावखेडा शिवार जळगाव हे मजुरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २८ ते २९ डिसेंबर रोजी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील ६० हजार रुपयांची रोकड आणि १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कैलास चव्हाण यांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून २९ डिसेंबर रोजी दुपारी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हरिलाल पाटील करीत आहे.
हे देखील वाचा :
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांवर गुन्हा दाखल
- जळगावात चाकूचा धाक दाखवून वाइन शॉप चालकाला मागितली खंडणी; गुन्हा दाखल