गुन्हेयावल

दुर्दैवी : वीजतारांना स्पर्श झाल्याने माकडाचा मृत्यू, ग्रामस्थांनी केले अंत्यसंस्कार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । नायगावजवळी वनक्षेत्रातून काही माकडे गावात ‎आली होती. त्यापैकी गुरुवारी‎ एका माकडाचा अपघाती मृत्यू ‎झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी‎ माकडावर विधीपूर्वक‎ अंत्यसंस्कार केले. दरम्यान, गावातील हे माकड प्रत्येक कुटुंबाला सदस्याप्रमाणे प्रिय होते. त्याच्या‎ अपघाती मृत्युमुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे. माकडाशी‎ झालेल्या आपुलकीतून विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. आता‎ उत्तरकार्य केले जाणार आहे.‎

यावल तालुक्यातील नायगाव हे गावत‎ सातपुड्याच्या पायथ्याशी‎ वसलेले आहे. या गावात गेल्या‎ काही महिन्यांपासून चार माकडे‎ आली आहेत. ग्रामस्थांना त्रास न‎ देता ही माकडे गावात वावरत‎ आहेत. गुरूवारी घरावरुन उडी‎ ‎घेत असताना एका माकडाचा‎ वीजतारांना स्पर्श झाला. त्याच‎ विजेचा धक्का बसल्याने माकड‎ जमिनीवर कोसळले. या घटनेत‎ माकडाचा मृत्यू झाला. विजय‎ सावळे यांनी या घटनेची माहिती‎ नागरिकांना दिली. त्यामुळे‎ ग्रामस्थांनी माकडावर‎ विधीपूर्वक अंत्यसंस्कार‎ करण्याचा निर्ण? घेतला. तसेच‎ गावात बॅँड लावून अंत्ययात्रा‎ ‎काढत अंत्यविधी करण्यात‎ आला. अंत्ययात्रेत संदीप सावळे‎ यांनी मृत माकडास अग्ग्नीडाग‎ दिला.

ग्रामस्थांनी खांदा देऊन‎ अंत्यविधी पार पडला. या संपूर्ण‎ विधीसाठी संदीप सावळे, राजेंद्र‎ सावळे, राजू पाटील, श्रावण‎ सावळे, योगेश कोळी, कैलास‎ सावळे, समाधान सावळे,‎ विजय गोसावी, शांताराम कोळी‎ व ग्रामस्थ सहभागी झाले.‎

Related Articles

Back to top button