⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

पाणीटंचाईच्या निषेधार्थ‎ भाजपाचे मटके फोडो आंदोलन‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । वरणगाव‎ शहरात ऐन उन्हाळ्यामध्ये दहा ते बारा दिवसांनी पिण्याचा पाणीपुरवठा केला ‎ ‎जातो. त्यामुळे नागरिकांना‎ पाणीटंचाईला समोर जावे लागत आहे. ‎शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी‎ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा, या ‎मागणीसाठी भाजपतर्फे पालिकेत मटके ‎फोडो आंदोलन करण्यात आले. आठ ‎दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत‎ न केल्यास आंदोलन अधिक तीव्र‎ करणार असल्याचा इशारा, माजी‎ नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पालिका ‎ ‎प्रशासनाला दिला.‎

भाजपातर्फे झालेले आंदोलन हे महिला ‎ ‎आघाडीच्या शहराध्यक्षा प्रणिता पाटील‎ चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आले.‎ पालिक प्रशासन अधिकारी पंकज‎ सूर्यवंशी यांनी भेट देऊन‎ आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.‎ वरणगाव शहरात १० ते १२ दिवसांनी‎ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे‎ पाणीपुरवठ्याचे दिवस कसे कमी‎ ‎करता येतील, यासाठी एकत्रित बैठक‎ घेण्यात येईल व उपाययोजना केल्या‎ जाणार आहेत. तसेच शहरासाठी नवीन‎ योजना मंजूर करण्यात आली आहे.‎ नवीन मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम‎ जलदगतीने व्हावे, योजनेचे उर्वरित‎ काम लवकर पूर्ण करावे अश्या सूचना‎ यासाठी पाठवतो असेही प्रशासन‎ ‎अधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले.‎ यावेळी भाजपतर्फे या योजनेचे काम‎ जाणीवपूर्वक संथगतीने केले जात‎ असल्याचा आरोप करण्यात आला.‎ त्यामुळे शहरातील नागरिकांना‎ पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.‎ सदर मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम‎ जलद गतीने करावे. तसेच वरणगाव‎ ‎शहरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा‎ सुरळीत करावा, अन्यथा आठ दिवसात‎ संपूर्ण वरणगाव शहरातील जनतेला‎ आव्हान करून भाजप मोठे आंदोलन‎ करेल असा इशारा माजी नगराध्यक्ष‎ सुनील काळे यांनी यावेळी दिला.‎ यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणा देऊन‎ पालिका परिसर दणाणून सोडला.‎

यावेळी महिला आघाडीच्या शहराध्यक्ष प्रणिता पाटील, कस्तुरा चौधरी इंगळे, नीता तायडे, माजी‎ नगरसेविका माला मेढे यांच्यासह भाजपचे शामराव धनगर, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, भाजयुमो शहराध्यक्ष आकाश‎ निमकर, रॉकी कश्यप, पप्पू ठाकरे, जिल्हा सरचिटणस डॉ.सादिक, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, कैलाश पाटील, गंभीर माळी,‎ बापू माळी, बळीराम सोनवणे, रमेश पालवे, राहुल जंजाळे, जितेंद्र मराठे, आकाश मराठे, छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष शशिकांत‎ चौधरी, कामगार नेते मिलिंद मेढे आदी उपस्थित होते.‎