⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

दुर्दैवी घटना : वीज पडून चौघांचा मृत्यू ; 54 जनावरेही दगावली

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२३ । सध्या अवकाळी पावसाने खुप धुमाकूळ घातला आहे. अश्यावेळी शुक्रवारी (7 एप्रिल) रात्री आणि शनिवारी (8 एप्रिल) रोजी मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर जिल्ह्यात नऊ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर, हिंगोली,परभणी आणि बीडमध्ये वीज पडून प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मराठवड्यात या दोन दिवसांत एकूण 54 जनावराचा मृत्यू झाला
आहे.

शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज पडून चौघांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा येथील आबादान भिका राठोड (वय 27 वर्षे) या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मांडेवडगाव येथील इंदुमती नारायण होडे (वय 60 वर्षे) यांचा मृत्यू झाला. बीडच्या आष्टी तालुक्यातील सूरडी गावातील शेतकरी महादेव किसन गर्जे हे झाडाखाली थांबले असताना त्यांच्यावर वीज पडली. पिराजी विठ्ठल चव्हाण (वय वय 33 वर्षे) यांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे.