⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

जिल्ह्यातील ८४४ गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर हाेणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील तब्बल ८४४ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर हाेणार आहे. या गावांसाठी तब्बल १ हजार २२ काेटी रूपयांचा निधी मिळणार आहे. या निधीतून गावांना पाणीपुरवठा करण्याच्या याेजनांचे तांत्रिक साेपस्कार पूर्ण झाल्याने येत्या वर्षभरात या याेजनांद्वारे गावांत जलसमृद्धी येणार आहे.

जलजीवन मिशनमधून येत्या तीन वर्षात जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक घरात नळ कनेक्शन देवून पाणी पाेहचवले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८३८ गावांसाठी ९२६ काेटी ७८ लाख रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात ८४४ गावांचा समावेश झाला आहे. या गावातील याेजनांसाठी निधी मंजूर झाला असून याेजनांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. यात सहा माेठ्या गावांसाठी ९६ काेटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील पहिल्या दाेन टप्प्यांची तांत्रिक साेपस्कार मार्गी लागले असून सन २०२४ पर्यंत या संपूर्ण याेजना पूर्ण हाेणार आहेत. त्यातील पहिल्या दाेन टप्प्यांची तांत्रिक साेपस्कार मार्गी लागले असून सन २०२४ पर्यंत या संपूर्ण याेजना पूर्ण हाेणार आहेत.

पहिल्या टप्प्यात या गावांचा समावेश
या याेजनेतून पहिल्या टप्प्यात ७७ गावांच्या याेजनांना दुसऱ्या टप्प्यात ९४ गावांच्या योजनांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूरपेठ आणि पहूर कसबे, चाळीसगाव तालुक्यातील टाकळी, मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे व सात गाव ग्रामीण पाणीपुरवठा योजना, भुसावळ तालुक्यातील कंडारी आणि साकेगाव या सहा माेठ्या गावांच्या याेजनेसाठी ९६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. या याेजना २०२४ पर्यंत पूर्ण हाेतील.

हे देखील वाचा :