उद्योगात अमर्याद संधी, जशी मेहनत कराल, तसे यश मिळवाल – प्रमोद संचेती
जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । नोकरीत वेळ निघून जातो. सृजनशीलता, नावीन्याचा ध्यास आणि सतत कामाची सवय संपून जाते. मात्र उद्योगात अमर्याद संधी आहेत. जशी मेहनत कराल, तसे यश मिळते. मात्र उद्योग, व्यवसाय करण्यासाठी स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जळगाव येथील विनले पॉलिमर्स प्रा. लीमिटेडचे संचालक प्रमोद संचेती यांनी रायसोनी महाविध् केले.
महाविद्यालयातील इस्टीट्युट- इंडस्ट्री सेलतर्फे “स्ट्रेट फॉर्म द गट्स” या शीर्षकाखाली हि कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, विभागप्रमुख प्रा. डॉ. मकरंद वाठ हे उपस्थित होते. प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी कार्यशाळेच्या प्रास्ताविकेत नमूद केले कि, मनुष्यबळ विकास करण्याचे काम गेली अनेक वर्ष रायसोनी इस्टीट्युट करत असून संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले असंख्य विद्यार्थी आज उद्योग क्षेत्रामधील यशस्वी उद्योजक व नामांकित कंपन्यामध्ये कार्यरत आहेत. तसेच हि कार्यशाळा नक्कीच विध्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नाची उत्तरे मिळवून देणारी ठरेल यावेळी त्यांनी रायसोनी इन्स्टिटयूटच्या विविध अभ्यासक्रमांबाबतही माहिती दिली. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रमोद संचेती यांनी पुढे म्हटले कि, काही वेळा व्यवसायात काही लोकांना अपयशाला सामोरी जावे लागते.त्याचे कारण त्यांच्या कडे चांगली टीम नसते. व्यवसायात आपली मुळे बळकट करण्यासाठी आणि व्यवसायात यश संपादन करण्यासाठी चांगले कामगार आणि कार्यसंघ असावे. वेळोवेळी आपल्या टीमच्या सदस्यांना प्रोत्साहन द्या. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कामाची योग्य पद्धत असावी. यामध्ये काम करणाऱ्यांची सहमती आवश्यक आहे. कामाच्या नवीन नवीन पद्धती अवलंबवा. कामात नाविन्यता नसेल तर व्यवसायात यश मिळवणे अवघड आहे. व्यवसायात ग्राहकच सर्वकाही आहे. आपण उत्पादन कितीही चांगले निर्मित केले जर ते ग्राहकांना आवडले नाही तर आपण काहीही करू शकत नाही. म्हणून वेळोवेळी ग्राहकांचा अभिप्राय घ्यावा. तसेच आपल्याला जीवनात प्रगती आणि यशाकडे जायचे असेल, तर उद्योग व्यवसायालाच प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर विभागप्रमुख प्रा. डॉ. मकरंद वाठ यांनी देखील बदलत्या काळातील उद्योग-व्यवसायात संधी कशा ओळखाव्यात याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. रफिक शेख, प्रा. विनोद महाजन, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. योगिता पाटील, प्रा. ज्योती जाखेटे, प्रा. राज कांकरिया, प्रा. प्राची जगवाणी हे उपस्थित होते. तर प्रा. राहुल त्रिवेदी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा.श्रिया कोगटा यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रीतमजी रायसोनी यांनी कौतुक केले.