उधना–जयनगर व उधना–बरौनी अनारक्षित स्लीपर ट्रेन धावणार ; खान्देशातील प्रवाशांना दिलासा

फेब्रुवारी 28, 2026 2:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । होळी आणि हंगामी प्रवासाच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, पश्चिम रेल्वे प्रशासनाने उधना–जयनगर तसेच उधना–बरौनी दरम्यान अनारक्षित विशेष स्लीपर कोच गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. यामुळे भुसावळसह खान्देशमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

train 1

उधना–जयनगर अनारक्षित विशेष गाडी

उधना–जयनगर अनारक्षित विशेष गाडी (क्रमांक ०९०४१) १ मार्च रोजी सकाळी ०५.४५ वाजता उधना येथून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०६.४५ वाजता जयनगर पोहोचेल. परतीची गाडी (क्रमांक ०९०४२) २ मार्च रोजी रात्री ०९.४५ वाजता जयनगरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १०.३० वाजता उधना येथे दाखल होईल.

या स्थानकांवर असेल थांबा?
ही गाडी चलथाण, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दिनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, पटना, बख्तीयारपूर, मोकामा, बरौनी, समस्तीपूर, दरभंगा आणि मधुबनी या ठिकाणी थांबेल.

उधना–बरौनी अनारक्षित विशेष गाडी

तसेच उधना–बरौनी अनारक्षित विशेष गाडी (क्रमांक ०९०५३) १ मार्च रोजी रात्री ०८.२५ वाजता उधना सोडेल आणि तिसऱ्या दिवशी मंगळवारी पहाटे ०५.१५ वाजता बरौनी पोहोचेल. परतीची गाडी (क्रमांक ०९०५४) २ मार्च रोजी दुपारी ०२.१५ वाजता बरौनीहून सुटेल आणि पुढील दिवशी रात्री १०.०० वाजता उधना येथे दाखल होईल.

या स्थानकांवर असेल थांबा?
या मार्गावरही चलथाण, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दिनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, पटना, बख्तीयारपूर आणि मोकामा या स्थानकांवर थांबे असतील.

संपूर्ण स्लीपर कोच डब्यांची ही सेवा प्रवाशांसाठी अधिक आरामदायक आणि सोयीची असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे, तसेच प्रवाशांना हंगामी गर्दीच्या काळात प्रवास सुलभ होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now