जळगावकरांसाठी आनंदवार्ता ! उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस आता दररोज धावणार

नोव्हेंबर 29, 2025 5:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२५ । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगावमार्गे धावणारी उधना-ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्स्प्रेस ही गाडी आतापर्यंत आठवड्यातून तीन दिवस धावत होती. परंतु वाढत्या गर्दीमुळे आणि प्रवाशांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने ही एक्सप्रेस आता दररोज धाववण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जळगावमार्गे गुजरात (उधना/सुरत) आणि ओडिसा (ब्रह्मपूर) या दोन्ही दिशांना प्रवास करणे आता अत्यंत सोयीचे होणार आहे.

amrut bharat train

आधी गाडी क्रमांक १९०२१ उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस ही रविवार, बुधवार व शुक्रवारी तर गाडी क्रमांक १९०२२ ब्रह्मपूर-उधना ही सोमवार, बुधवार व शुक्रवारी धावणार होती. आता या दोन्ही रेल्वे दररोज धावणार आहेत. यामुळे जळगावकरांना गुजरातकडे आणि नागपूरकडे जाण्यासाठी ही गाडी सोयीची ठरणार आहे. रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर आता या नवीन बदलाची अधिकृत अंमलबजावणी कधीपासून होणार याची घोषणा लवकरच करण्यात येईल. सध्या तारीख जाहिर करण्याची अंतिम प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सध्या गाडी क्रमांक १९०२१ उधना-ब्रह्मपूर ही एक्स्प्रेस रविवार, बुधवार व शुक्रवारी उधना येथून सकाळी ७ वाजून १० मिनिटाने निघत असून ती अमळनेरला सकाळी ११.१० वाजता, धरणगावात ११.४५ वाजता, जळगावला दुपारी १२.४५, भुसावळ स्टेशनला दुपारी १ वाजता पोहोचेल. तसेच १९०२२ ब्रह्मपूर-उधना ही सोमवार, बुधवार व शुक्रवारी सकाळी ब्रह्मपूर येथून रात्री ११ वाजून ४५ मिनिटाने निघत असून ती भुसावळला तिसऱ्या दिवशी पहाटे २ वाजता, जळगावला २.३८ ला, धरणगावला पहाटे ३.३० मिनिटाने तर अमळनेर स्टेशनला ३.५१ मिनिटाने पोहोचेल. यानंतर ती उधना येथे सकाळी ८.४५ ला पोहोचेल.

या स्थानकांवर आहेत थांबा?

या मार्गात ही गाडी बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खरियार रोड, कांताबंजी, केंदखेडा, केंदखेडा, रांगोळी, मुरगाव, ता. पार्वतीपुरम, बॉबिली, विझियानगरम, श्रीकाकुलम रोड आणि पलासा स्टेशन्स दोन्ही दिशेने.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now