खुशखबर! उधना-पुरी-उधना विशेष एक्स्प्रेस धावणार, भुसावळ जळगावला असेल थांबा

सप्टेंबर 8, 2024 10:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२४ । सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने उधना-पुरी-उधना दोन फेस्टिव्हल विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या एक्स्प्रेसला जळगाव, भुसावळला थांबा आहे.

train 3 jpg webp

रेल्वे क्रमांक ०८७४२ उधना-पुरी ही रेल्वे १७ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. उधना येथून रो रोज सायंकाळी ५ वाजता ही रेल्वे सुटेल, नंतर अमळनेरला रात्री ८.१५ वाजता, जळगाव स्थानकावर रात्री ९.४५ वाजता तर भुसावळला रात्री १०.१५ वाजता थांबा घेणार आहे. दुसऱ्या दिवशी रात्री १०.४५ वाजता ही रेल्वे पुरी पोहोचेल.

रेल्वे क्रमांक ०८४७१ ही विशेष रेल्वे १६ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. सकाळी ६.३० वाजता पुरीहुन ही रेल्वे सुटल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वाजता भुसावळात पोहोचेल. नंतर जळगावात ९.१५ वाजता तर अमळनेरला १०.०३ वाजता थांबा घेईल. याच दिवशी दुपारी २ वाजता ती उधना पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा :
चालठाण, व्यारा, नंदूरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा रोड, संबलपूर सिटी, रायराखोल, अंगुल, तालचेर रोड, धेनकनाल, भुवनेश्वर आणि खुर्दा रोड स्टेशन्स दोन्ही दिशेने.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now