बेळगाव सह वादग्रस्त सीमा भाग केंद्रशासित करा – उद्धव ठाकरे

जळगाव लाईव्ह न्युज । २६ डिसेंबर २०२२ । बेळगाव सह वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये केली. यावेळी त्यांनी सीमा प्रश्नावरून सरकारला चांगलंच घेरण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सत्ता पडल्यानंतर पहिल्यांदाच विधान परिषदेत बोलले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सीमा प्रश्न उचलून धरला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्याप्रकारे कर्नाटकने ने तिथल्या बेळगांव महानगरपालिकेला बरखास्त केलं आणि त्यांची महाराष्ट्रात येण्याची मागणी फेटावून लावली. त्याचप्रकारे आपल्यालाही ज्या आपल्या ग्रामपंचायत यांनी कर्नाटक मध्ये जायचा प्रस्ताव मांडला आहे. अश्यांनी आपणही बरखास्त करायचं का? याबाबत आपण निर्णय घ्यायला पाहिजे असे ते म्हणाले.

याचबरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमई गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रावर टीका करत आहेत आणि कर्नाटकच्या सीमावाढी बद्दल ठाम आहेत. मात्र दुसरीकडे आपले मुख्यमंत्री काहीच का बोलत नाही? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.

तर दुसरीकडे त्यांनी एकनाथ शिंदे यांना देखील चिमटा काढला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्या पक्षात असातांना तुम्ही बेळगाव सीमावासियांसाठी लठ्या काठ्या खल्या. असं कधीतरी तुम्ही बोलले होते. मात्र आता तुम्ही गप्प बसण्याची वेळ नाही. तुम्ही काहीतरी बोलायला हवं. काहीतरी काम करायला हवं. हा प्रश्न मार्गी लावायला हवा.