जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर यावल शहराबाहेर वढोदाजवळ दुचाकी-ट्रकचा अपघात झाला. त्यात दोन तरुण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडला. जखमी दोघांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अधिक माहिती अशी की, अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर यावल शहराबाहेर वढोदा गावाजवळ दुचाकी घेऊन खुशाल संजय सोनवणे (वय १८) व गौरव कैलास तायडे (वय १९, दोन्ही रा.कासवा ता.यावल) हे चोपड्याकडून यावलकडे येत होते. तर एक ट्रक यावलकडून चोपडाकडे जात होती. ही दुचाकी आणि ट्रकचा अचानक अपघात घडला. त्यात दोघे तरुण जखमी झाले. जखमी अवस्थेतील या दोघांना शिरसाड (ता.यावल) येथील गणेश तायडे यांनी तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले.
तेथे डॉ.शुभम तिडके, अधिपरीचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, सुमन राऊत, वाय. डी. चौधरी, संजय जेधे आदींनी प्रथमोपचार केले आहे. अपघात कसा झाला हे कळू शकले नाही.