Jalgaon : चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी जळगावात आला अन् फसला, पाच दुचाकी जप्त

डिसेंबर 23, 2024 11:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२४ । जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याच दरम्यान, जळगाव शहरात चोरीच्या दुचाकी विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याने जळगाव शहरासह जिल्ह्यातून अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत, आणि त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

New Project 1

पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना 22 डिसेंबर रोजी एक संशयित दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर, पोलिसांनी अजिंठा चौफुली येथे सापळा रचून दीपक प्रेमसिंग सोळंके याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.

दीपक सोळंके याने जळगाव शहरातून ३, छत्रपती संभाजीनगर येथून १, आणि अडावद येथून १ अशा एकुण ५ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलीस नायब सुभेदार योगेश बारी, राहुल रगडे, विशाल कोळी, आणि फिरोज तडवी यांनी केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now