गुन्हेजळगाव जिल्हा

अल्पवयीन मुलीवर लग्नापूर्वी भावीपतीकडून अत्याचार: धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२४ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून यातच दरम्यान धारगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी लग्नापूर्वी तिच्या होणाऱ्या पतीकडून अत्याचाराचा बळी ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी प्रकार काय?
पीडित मुलगी धरणगाव तालुक्यातील एका गावात तिच्या कुटुंबासोबत राहते. तिचे लग्न जामनेर तालुक्यात राहणार्या तिच्या चुलत आत्याच्या मुलगाशी ठरलेले होते. मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा त्यांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला गेला होता. यामुळे दोघांमध्ये फोनवरून संवाद सुरू होता. ऑगस्ट 2024 मध्ये, पीडित मुलीचा चुलत आत्याचा मुलगा, म्हणजेच भावी पती, तिला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी घरात कोणीही नसताना त्याने तिच्यावर जबरी अत्याचार केला.

या घटनेचा पर्दाफाश झाल्यानंतर, पीडित मुलीने तिच्या आई-वडिलांसह धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यानुसार, अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपीवर रविवार, 22 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12:30 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button