जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२५ । जळगाव शहरातील सराफा बाजारामधील गोयल ज्वेलर्स मधून दोन बुर्खाधारी महिलांनी काही दिवसांपूर्वी हात चलाखीने दीड लाखाचे सोन्याचे दागिने लांबविले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघं संशयित महिलांना अटक करत त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. इरफान बानो अल्लाहबक्ष शेख, सईदा रहमततुल्ला अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

या घटनेबाबत असं की, जळगाव शहरातील सराफ बाजार पेठेतील विश्वनाथ हनुमानदास अग्रवाल (वय 69) यांच्या गोयल ज्वेलर्स दुकानात २८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता दोन बुरखाधारी महिलांनी २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेनंतर पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. गोयल ज्वेलर्समध्ये बसवलेल्या आणि पोलिस विभागाच्या ‘नेत्रम’ कॅमेर्यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. यामध्ये संशयित महिला चोरी करून सुभाष चौक, घानेकर चौकातून पायी जात असल्याचे आढळले. त्यानंतर त्या बळिराम पेठ परिसरात एका वाहनात बसताना दिसल्या.
सीसीटीव्हीच्या आधारे त्या वाहनाचा क्रमांक (एमएच १४ डीएफ ५७०३) असल्याचे निष्पन्न झाले. वाहनाच्या FASTag डिटेल्सच्या मदतीने तपास पुढे नेण्यात आला. वाहन चालक आसिफ मो. रफिक अहमद अन्सारी (वय-२२, रा. मालेगाव, जि. नाशिक) याच्याशी संपर्क साधला असता, त्याने 28 जानेवारी रोजी सईदा रहमतुल्ला अन्सारी (वय-४१) आणि इरफाना बानो अल्लाह बक्ष शेख (वय-४४) या दोन महिलांना जळगाव येथे भाड्याच्या गाडीने आणले होते अशी माहिती दिली. त्यानुसार पोलीसांनी दोन्ही महिलांना मालेगाव येथून अटक करण्यात आले. त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
महिला सराईत गुन्हेगार
या दोन्ही महिलांवर यापूर्वीही विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे आढळले. त्या न्यायालयीन कामानिमित्त जळगावला आल्या होत्या आणि परतीच्या मार्गावर त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. दोन्ही महिलांची अधिक चौकशी केली असता दोन्ही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वेगवेगळे चोरीचे सात गुन्हे दाखल आहे