चोरीच्या तीन दुचाकीसह बऱ्हाणपूरचा चोरटा भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात

सप्टेंबर 18, 2025 7:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून चोरट्यांना खाकीचा धाकच नसल्याचं दिसून येत आहे. यातच पोलिसांकडून काही दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आले यात भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने एका सराईत दुचाकी चोराला अटक केली. त्याच्याकडून २ लाख २५ हजारांच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या. या कारवाईत इतर दोन गुन्हे उघडकीस आले.

kulbhushanpatil firing case arrest

फिर्यादी सुनील पांडुरंग इंगळे, (रा. पांडुरंगनाथ नगर भुसावळ) यांची रॉयल एनफिल्ड बुलेट (एमएच.१९.ईडी.७६५०) चोरीस गेल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल होता. तपासात पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना संशयित मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डीबी पथकाने संशयित अरशद खान अहमदखान (वय २२, रा. ख्वॉजा नगर, आझाद नगर, बऱ्हाणपूर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

त्याने विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या. त्यांची किमत २ लाख २५ हजार रुपये आहे. कारवाई करणाऱ्या पथकामध्ये सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, कांतीलाल केदारे, किरण धनगर यांचा समावेश होता. अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories