जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । कारने दिलेल्या धडकेत मोठा वाघोदा (ता.रावेर) येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सावदा-फैजपूर मार्गावरील जे.के.स्टीलजवळ शनिवारी सायंकाळी ७ वाजेदरम्यान घडली. रशीद अहमद तडवी (वय ३६) असे मृत तरुणाचे नाव असून याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत असे की, मोठे वाघोदा येथील रहिवासी रशीद तडवी हा केळी कामगार होता. तो जेवणाचा डबा घेण्यासाठी दुचाकीने (क्रमांक एमएच.१९-बीजे.४३७८) फैजपूरकडे जात होता. यावेळी सावद्याकडून येणाऱ्या कारने (एमएच.१९-एजी.६७६९) समोरून येत धडक दिली. त्यात दुचाकीस्वार रशीद तडवी हा गंभीर जखमी होऊन मृत झाला. ही माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

तडवी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवला. अपघातातील वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अपघातात ठार झालेला तरूण हा कुटुंबातील कमावती व्यक्ती होती.
हे देखील वाचा :
- नगराध्यक्ष भेटत नसल्याने खुर्चीलाच निवेदन; अमळनेरमध्ये राष्ट्रवादी युवकचे अनोखे आंदोलन
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ घातक तणनाशकावर अखेर बंदी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! 1200 हून अधिक पदांसाठी भरती, पात्रता काय?
- ‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती
- डॉ. दिपकसिंह राजपूत यांच्याकडून संरक्षणमंत्र्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार












