रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील उमरा येथुन मध्यरात्री यात्रेहुन परतणाऱ्या लालगोटा येथील दोघा दुचाकीस्वारांचा रानडुकराने धडक दिल्याने अपघात होऊन गंभीर जखमी झाले. दोघांवर जळगांव येथे उपचार सुरू आहेत.
मंगळवारी तालुक्यातील उमरा येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त यात्रोत्सव होता. यासाठी लालगोटा येथील मोहनचंद विजानन पवार (वय २१) व विलास विरेंद्र पवार (वय १५) हे दोघे आले होते. यात्रा आटोपुन ते घराकडे परतत असतांना उमरा ते लालगोटा जुन्या रस्त्यावर रानटी डुकराने त्यांच्या मोटारसाईकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसाईकलवरुन दोघेही जोरात फेकले गेले. या अपघातात दोघेही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. मोहनचंद याने फोनवरुन हि वार्ता वडीलांना सांगितली. पहाटे साडेतीन वाजता जळगांव येथे त्यांना उपाचारार्थ दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.