⁠ 
बुधवार, मे 1, 2024

घसरणीनंतर जळगावचा पारा पुन्हा वाढू लागला ; एकाच दिवसात ४ अंशाने वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२४ । राज्यात वातावरणात बदल होताना दिसत आहे. गेल्या महिन्या अवकाळी पाऊस आणि काहीसं थंड वातावरण होतं. यानंतर जळगावचे तापमान ३८ अंश सेल्सिअसवर गेल्याने उन्हाच्या झळा बसत होत्या. यामुळे मार्चची सुरूवातच ‘तापदायक’ होण्याची चिन्हे होती.

परंतु या दरम्यान तापमानात घट झाल्याने रात्री आणि सकाळी उशिरापर्यंत थंडीची अनुभूती आली. रविवारपासून सलग चार दिवस जळगावचे दिवसाचे तापमान ३१ अंशाखाली होते. तर यात रात्रीचे तापमान दोन दिवस ११ अंशावर आल्याने कडाक्याची थंडी जाणवली. मात्र आता कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी जळगावचे तापमान कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.तर किमान तापमान १२ अंशापुढे गेलं. यापूर्वी मंगळवारी जळगावचे तापमान ३० अंशावर होते. एकंदरीत एकाच दिवसता कमाल तापमानात ४ अंशाने वाढ झाली.

दरम्यान, जळगावात मार्च महिन्यात एरवी तापमान जास्त असते. पण वाऱ्यांचे वहन होत असल्याच्या काळातच उत्तर भारतात पश्चिमी झंझावातामुळे पाऊस, बर्फवृष्टी होत आहे. त्याचे परिणाम थेट खान्देशापर्यंत पहायला मिळून तापमानात घसरण दिसून आली. मागील काही दिवसापूर्वी ३८ अंशावर असलेले जळगावचे तापमान ३१ अंशाच्या खाली घसरले होते. त्यात दोन दिवस रात्रीचं तापमान ११ अंशावर आल्याने रात्री आणि पहाटच्या वेळेस कडाक्याची थंडी जाणवली. मात्र दुपारी उन्हाच्या झळा बसत होत्या. दरम्यान, आता तापमानात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. आगामी आठ दिवसात जळगावचा पारा ४० वर जाण्याची आहे.