---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा भडगाव

भडगावात दुचाकीला कारची धडक, विद्यार्थ्यासह तरुण ठार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयासमोर चौफुलीवर दुचाकी-चारचाकीच्या अपघातात अमोल सोनवणे (वय १५) व पंकज भोई (वय १८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ९ वाजता घडली.

accident 6 jpg webp

भडगाव ग्रामीण रुग्णालयासमोरील चौफुलीवर गतिरोधक नसल्याने सातत्याने हे अपघात होत राहतात. मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकीची (क्र.एम.एच.२७-ए.सी.६८४३) हायवेच्या वळण रस्त्यावर समोरा समोर धडक झाली. यात लाडकूबाई माध्यमिक शाळेतील इयत्ता नववीचा विद्यार्थी अमोल दीपक सोनवणे (वय १५, रा.यशवंतनगर) याचा जागीच मृत्यू झाला. तर पंकज भारत भोई (वय १८, रा. भोईवाडा) हा गंभीर जखमी झाला. त्याच्या हातापायांना व पोटाला मार लागला. त्याला तातडीने पाचोरा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जळगावला हलवण्यात आले. मात्र, जळगावातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्री हा अपघात होताच चारचाकीचालक वाहन सोडून पसार झाला.

---Advertisement---

हे देखील वाचा :

    Join WhatsApp Channel

    Join Now

    google-newsFollow on Google News

    Join Now

    ---Advertisement---