Jalgaon : अवैध शस्त्र बाळगणारी चार जणांची टोळी गजाआड; दोन गावठी पिस्तुल, 10 जिवंत काडतुसे जप्त

सप्टेंबर 12, 2025 10:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२५ । जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गेंदालाल मील परिसरात दोन गावठी पिस्तुलसह १० जिवंत काडतूस बाळगणारी चार जणांची टोळी पकडली. त्यांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तुल, १० जिवंत काडतुसे, एक मॅगझिन आणि एक कार असा एकूण १ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने खळबळ उडाली असून

dd

शहर पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रणय सुरेश पवार हे पथकासोबत १० सप्टेंबर रोजी रात्री गस्तीवर असताना त्यांना गेंदालाल मिल परिसरात एका कारमध्ये काही संशयित अवैध शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली.पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या सूचनेवरून गुन्हे शोध पथक घटनास्थळी पोहोचले.

संबंधित कार थांबवून विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांना झाडाझडतीत कारमध्ये दोन गावठी पिस्तुलासह काडतुसे सापडली. या कारवाईत युनूस उर्फ सद्दाम सलीम पटेल (वय ३३), निजामोद्दीन शेख (वय ३१), शोएब अब्दुल सईद शेख (क्य २९) आणि सौहिल शेख उर्फ दया (वय २९) या चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली. दोन पिस्तूल, १० जिवंत काडतुसे, एक मॅगझिन आणि एक कार जप्त करण्यात आली.

पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांना संशयित हे जून्या वादातून घातपात करण्याच्या तयारीत होते. परंतू त्यापुर्वीच शहर पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या. यातील मुख्य संशयित यूनूस उर्फ सद्दाम पटेल याच्याविरुद्ध खूनासह अन्य पाच गंभीर गुन्हे दाखल आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now