जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२५ । महाराष्ट्रात नागपूर-पुणे (Nagpur-Pune) आणि नागपूर-मुंबई (Nagpur-Mumbai) यादरम्यान दोन वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) लवकरच धावणार आहेत. विशेष नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस भुसावळ (Bhusawal) आणि जळगाव (Jalgaon) मार्गे धावणार आहे. यामुळे याची उत्सुकता जिल्ह्यातील नागरिकांना लागली आहे. या एक्सप्रेसला कुठे कुठे थांबा असणार? तिकीट किती असू शकते? याबाबतच्या चर्चेने जोर धरलाय.

नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई या दोन शहरांसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेचे नागपूरचे डीआरएम (DRM) विनायक गर्ग (Vinayak Garg) यांनी यासंदर्भात नुकताच एक प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे (Railway Board) सादर केला आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे. केंद्रीय बोर्डाकडून (Center Board) परवानगी मिळाल्यानंतर ही ट्रेन सुरू होतील.
सध्या देशातील विविध शहरातून वंदे भारत एक्सप्रेस धावत असून त्याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. परंतु भुसावळ मार्गे अद्यापही एकही वंदे भारत एक्सप्रेस धावत नाहीय. मात्र यातच आता नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई यादरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावू शकतात. विशेष ही ट्रेन भुसावळ आणि जळगाव मार्गे धावणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. त्याशिवाय आरामदायी रेल्वे प्रवासाचा अनुभवता येणार आहे. त्यामुळे आता जळगावकरांची वंदे भारत एक्सप्रेसची उत्सुकता लागली आहे
थांबे आणि प्रवासवेळ:
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस वर्धा, धामणगाव, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, दौंड स्टेशनवर थांबणार आहे. सध्या नागपूर-मुंबई प्रवासासाठी १२ ते १६ तासांचा वेळ लागतो, तर नागपूर-पुणे प्रवासासाठी १५ तासांचा वेळ लागतो. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर नागपूर-पुणे प्रवास ८ ते १० तासांवर येण्याची शक्यता आहे.
तिकीट आणि टाइम टेबल:
दरम्यान, वंदे भारत ट्रेनच्या तिकीट आणि टाइम टेबल संदर्भात सध्या रेल्वने अधिकृत घोषणा केलेली नाही.