⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

शाळेच्या पहिल्या दिवशी यंदा दोन शालेय गणवेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । गेल्या दोन तीन वर्षांपासून कोरोना संसर्गजन्य स्थितीमुळे पहिली ते आठवीतील शालेय विद्यार्थ्यांना एकच गणवेश मिळाला, तोही उशिराने. यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी दाेन गणवेश देण्याचे नियोजन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.

जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार ७४४ विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी ९ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्य शिक्षण विभागाकडून निधी प्राप्त होताच, त्याचे शालेय समितीकडे त्याचे वितरण केले जाणार आहे.
राज्य सरकारकडून गणवेशाचा निधी जिल्हा परिषदेला वर्ग करण्यात येणार आहे. निधी प्राप्त होताच तो निधी तालुकास्तरावरून संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीला पाठवला जाणार आहे.