भरधाव ट्रकची ट्रक्टरला धडक, दोन जण जखमी

एप्रिल 2, 2022 5:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२२ । महामार्गवरील अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच पाळधी येथील महामार्गावरील पेट्रोल पंपासमोर भरधाव ट्रकने ट्रक्टरला धडक देऊन झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, याप्रकणी धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रकचालक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

accident jpg webp

याबाबत असे की, धरणगाव तालुक्यातील पाळधी शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर पारस पेट्रोल पंप आहे. या रोडवर (एमएच १८ बीए १८८) भरधाव ट्रकने ट्रक्टर (एमएच १९ सीव्ही ६६०४) व ट्राली क्रमांक (एमएच १९ एएन ७६२५) ला धडक दिली.

कल्पेश सुधाकर शिंदे (वय-२६) आणि मयुर सुभाष पाटील ( दोन्ही रा. पोखरी ता.धरणगाव ) हे जखमी झाले धरणगाव पोलीस ठाण्यात कल्पेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक भटू मोतीलाल महाले ( रा. धुळे ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी करीत आहेत

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now