जळगावात दोघांकडून घरावर गोळीबार; शहरात खळबळ, चौकशी सुरु

ऑगस्ट 7, 2025 5:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२५ । जळगाव शहरात गुन्हेगारी पुन्हा डोकंवर काढत असल्याचं दिसत असून अशातच शहरातील कोल्हे नगर परिसरामधील एका घरावर गोळीबार केल्याची घटना समोर आलीय. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी रामानंद नगर पोलीस पोहचले असून चौकशी सुरु केलीय.

jlgr

याबाबत असे की, कोल्हे नगर परिसरातील १०० फुटी रोडजवळ सपकाळे कुटुंबीय भाड्याने राहतात. त्यांच्याच परिचयातील दोन तरुण रात्री त्या ठिकाणी आले होते. काहीही कारण नसताना रात्री २ वाजेच्या सुमारास त्यांनी दारूच्या नशेत घरात गोळीबार केला. रात्रभर याबाबत कुणालाही माहिती नव्हती.

गुरुवारी दुपारच्या सुमारास याबाबत वाच्यता झाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटना घडलेल्या घरी भेट दिली. पोलिसांनी घरातून एक रिकामी पुंगळी हस्तगत केली आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now