⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

चिंता वाढली ! ‘ओमिक्रॉन’चा अखेर भारतात शिरकाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२१ । आफ्रिका तसच युरोपमध्ये आढळून आलेल्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात दहशत पसरली आहे. कोरोनाच्या या नवीन प्रकाराचा धोका वाढत आहे. ओमिक्रॉनचा अखेर भारतात शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असून तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टापेक्षा कित्येक पट घातक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली आहे. आतापर्यंत 29 देशांमध्‍ये ओमिक्रॉन वेरिएंटने संक्रमित रूग्णांची ओळख पटली आहे आणि डब्ल्यूएचओने या प्रकाराला चिंतेच्‍या श्रेणीत ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेत या प्रकाराचा संसर्ग झालेल्या रुग्णाची प्रथम ओळख झाली.

कर्नाटकात सापडलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 11 तारखेला तर दुसरा 20 नोव्हेंबरला भारतात आला होता. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता ओमिक्रॉनचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यातलाच एक रुग्ण हा 64 वर्षाचा आहे. तर दुसरा रुग्ण हा 44 वर्षांचा आहे. महाराष्ट्रासह देशभरात आफ्रिकेतून आलेल्या आणि येणाऱ्यांवर प्रशासनाचा वॉच आहे.


दुप्पट अधिक धोकादायक?
भारतात आढळलेल्या ओमिक्रॉन संसर्गाबाबत आरोग्य मंत्रालयाच्या वतीने माहिती देताना, NITI आयोगाचे सदस्य व्हीके पॉल म्हणाले, ओमिक्रॉन व्हेरिएंटला WHO ने ‘चिंतेचे प्रकार’ म्हणून घोषित केले आहे. Omicron ची 29 देशांमध्ये 373 प्रकरणे नोंदली गेली आहेत. आपल्या देशात त्यावर लक्ष ठेवले जात आहे. ते म्हणाले की असे असू शकते की हा प्रकार मागील प्रकारापेक्षा पाचपट वेगाने संसर्ग पसरवू शकतो. WHO इनपुटमध्ये 45 ते 52 उत्परिवर्तन नोंदवले गेले आहेत.