⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

LIVE : लोकसभा 2024 निवडणूक आयोगाची लाईव्ह पत्रकार परिषद..

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२४ । होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा थोड्या वेळात जाहीर होणार असून यासाठी आज दुपारी ३ वाजेला निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु झालीय. यावेळी निवडणुकीसाठी काय काय तयारी केली जात असून याबाबतची माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार असून १६ जूनला सध्याचा लोकसभा निवडणुकीचा काळ संपत असल्याची माहिती राजीव कुमार यांनी यावेळी दिली. देशात ५५ लाखांपेक्षा अधिक ईव्हीएम मशीन निवडणुकीसाठी तयार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. देशात ९७.८ कोटी मतदार असून त्यापैकी ९६.८ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. 49.7 कोटी पुरूष तर 47.1 कोटी महिला मतदार आहेत. यंदा 1.82 कोटी नवीन मतदार मतदान करणारदेशात १० लाख मतदान केंद्र आहे. आम्ही गेल्या दोन वर्षात सर्व राज्यात जावून पाहणी केली आहे. यंदा १.८२ कोटी मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत.

पहा लाईव्ह..
मतदान केंद्रावर शौचालय, व्हिलचेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा असणार आहे
ज्यांचं वय 85 वर्षांपेक्षा अधिक आहे आणि जे दिव्यांग आहेत, त्यांच्या घरी जाऊन मतदार घेणार येईल. त्यासाठी त्यांना एक फॉर्म भरुन द्यावा लागेल. त्यानंतर त्यांच्या मतदानाच्या दिवशी त्यांच्या घरी मतपेढी नेली जाईल, अशी माहिती यावेळी राजीव कुमार यांनी दिली
निवडणुकीत हिंसेला कोणतेही स्थान नाही. मतदाराला तक्रार असल्यास सी-व्हिजील ॲपवर नोंदवता येईल.
निवडणुकीदरम्यान मसल पॉवर, मनी पॉवर रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांसोबत काम करणार
2 वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार. पैशाचा दुरूपयोग होऊ देणार नाही.
दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर राहणार असून असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.