गुन्हेजळगाव शहर

महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन, महावितरणचे दोन कर्मचारी तडकाफडकी निलंबित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । कंत्राटी तत्त्वावर सेवेत असलेल्या महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर महावितरणच्या कार्यकारी संचालकांनी दोघांना तडकाफडकी निलंबित केले आहे. उद्धव रामभाऊ कडवे (व्यवस्थापक) आणि राजेंद्र निळकंठ अमोदकर (निम्नस्तर लिपिक) अशी निलंबित झालेल्या दोघांची नावे आहेत.

महावितरणच्या जळगाव मंडळ कार्यालयातील मानवसंसाधन विभागाचा व्यवस्थापक उद्धव कडवे याने कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला असलेल्या तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. तर लिपिक राजेंद्र अमोदकर यानेही तरुणीशी अश्लील वर्तन केले होते. कार्यालयाच्या विशाखा समितीकडे तक्रार करुनही त्याची दखल न घेतल्याने पीडितेने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. त्यानुसार दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, याप्रकरणी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी देखील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे कार्यकारी संचालक अरविंद भादिकर यांनी दोघांच्या निलंबनाचे आदेश काढले. हे आदेश जळगाव मंडळ कार्यालयाला ६ जून रोजी प्राप्त झाले आहेत.

Related Articles

Back to top button