दोन अल्पवयीन मुलीस पळविले

जुलै 23, 2022 11:44 AM

Bhadagaon, Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । भडगाव तालुक्यातील एका भागातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व जळगाव शहरतल एका परिसरातून १७ वर्षे १० महिन्याच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत वेगवेगळ्या पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 1 1 jpg webp

भडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही भडगाव तालुक्यात आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होती. तिला काल शुक्रवारी कुणी तरी अज्ञात इसमाने पळवून नेले. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी भडगाव पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार आज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गणेश वाघमारे करत आहेत.

दुसरी घटना जळगावच्या एका परिसरात घडली आहे. १७ वर्षे १० महिन्याची अल्पवयीन मुलगीला हिला देखील अज्ञात इसमाने पळवून नेले आहे. याबाबत तिच्या नातेवाईकांनी एमआय डीसी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दीपक जगदाळे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now