⁠ 
शनिवार, मे 4, 2024

दरेगावला आढळले दोन बिबट्याचे बछडे

जळगाव लाईव्ह न्युज | २७ ऑगस्ट २०२१ | चाळीसगाव तालुक्यात गिरणा पट्ट्यात बिबट्याचा दहशत कायम असून तीन दिवसापूर्वी सेवानगर येथे गाईचे वासरू फस्त केल्याचा प्रकार समोर आला असताना काल दरेगाव शिवारात रस्त्यावर शेतकऱ्यांना बिबट्याच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली आहे.

याबाबत माहिती अशी की दरेगाव येथे देवघट रस्त्यावर दयाराम राठोड यांच्या शेतात शेतकऱ्यांना बिबट्याचे दोन बछडे दिसली त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली.

गेल्या काही दिवसांपासून वरखेडे, पिंपळवाड म्हाळसा, लांबे वडगाव, बहाळ परिसरात बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे गिरणा पट्टा भयभीत झाला आहे याबाबत वन विभागाने बिबट्याचा शोध घेऊन नागरिकांच्या मनातील भय दूर करावे अशी मागणी होत आहे.