⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

जळगाव महापालिका आयुक्त डॉ. गायकवाड यांची अखेर बदली

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२४ । लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर राज्य शासनाने तातडीने अधिकाऱ्यांच्या बदलींचे आदेश जारी केले असून यात जळगाव महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचाही समावेश आहे. त्यांना त्यांच्या पदाचा कार्यभार हा अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सोपवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात चार वर्षांचा कार्यकाळ झाल्यानंतरही पदावर कायम असलेल्या महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची अखेर मंगळवारी विद्या गायकवाड बदलीचे आदेश नगरविकास विभागाने जारी केले. आयुक्त पदाचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवतांकडे राहिला.