फिरायला गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला ; सव्वादोन लाखाचे दागिने लंपास

फेब्रुवारी 18, 2022 8:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घेतला आहे. दिवसेंदिवस चोरट्यांच्या घटना वाढतच आहे. अशात अमळनेर येथे पती कर्तव्य बजावण्यासाठी गेले असताना सकाळी फिरायला गेलेल्या महिलेच्या घरातून सव्वादोन लाखाचे दागिने अज्ञात चाेरट्यांनी लंपास केल्याची घटना २५ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली.

gharphodi chori jpg webp

शहरातील प्रभाकर नगरमधील वैशाली तुषार जोगी ही महिला २५ रोजी पहाटे ५ वाजेला दोन्ही मुले झोपलेली असताना परिसरातील दोन महिलांसोबत फिरायला गेली हाेती.

असा गेला ऐवज चोरीला
या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाट किल्लीने उघडून कपाटातील ६२ हजार ११९ रुपयांची २१ ग्रॅम सोन्याची माळ, १ लाख २७ हजार २०० रुपयांच्या ४० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाटल्या, १२ हजार ३३८ रुपयांचे सोन्याचे पेंडल, १२ हजार ५०० रुपयांचा मोबाइल, १४५० रुपये रोख असा एकूण २ लाख १५ हजार ६५७ रुपयांचा ऐवज चाेरट्यांनी चोरून नेला आहे.

या प्रकरणी वैशाली जाेगी या महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now